Next to Shatayu Hospital, Bhugaon, Pune Mon–Sat 9 AM – 9 PM · Sun 9 AM – 2 PM +91 84129 93865
महिला डॉक्टर · आठवड्याचे सातही दिवस सुरू

भुगाव, पुणे येथील स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ

डॉ. सुरभी वामन-घैसास · MS OBGY (ISM)

मासिक पाळीच्या तक्रारी, PCOS पासून गर्भावस्था व रजोनिवृत्तीपर्यंत – आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या आरोग्याची आपुलकीने काळजी. शतायु हॉस्पिटलच्या शेजारी, भुगाव.

आमच्या सेवा

स्त्रियांच्या आरोग्यासाठी संपूर्ण काळजी

गर्भावस्थेतील तपासणी व काळजी

गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत नियमित तपासणी, आहार व औषधांविषयी मार्गदर्शन, आणि प्रसूतीनंतरची काळजी.

English माहिती

PCOS / PCOD उपचार

अनियमित पाळी, वजन वाढणे, मुरुमे व हार्मोनमधील असंतुलनावर उपचार.

English माहिती

मासिक पाळीच्या तक्रारी

अनियमित, जास्त किंवा वेदनादायक पाळी, पाळी चुकणे आणि पांढरे पाणी जाणे यावर उपचार.

English माहिती

मूल होण्यासाठी सल्ला

गर्भधारणेस अडचण येणाऱ्या जोडप्यांसाठी तपासणी, ओव्ह्युलेशन तपासणी व मार्गदर्शन.

English माहिती

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळजी

हॉट फ्लॅशेस, झोप, मनःस्थितीतील बदल आणि हाडांच्या आरोग्याविषयी सल्ला.

English माहिती

कुटुंब नियोजन

गर्भनिरोधक पर्यायांविषयी सल्ला व कॉपर-टी.

स्त्रियांच्या आरोग्य तपासण्या

पॅप स्मिअर, स्तन तपासणी व नियमित आरोग्य तपासणी.

किशोरवयीन मुलींचे आरोग्य

पहिल्या पाळीविषयी व वाढत्या वयातील शंकांसाठी आपुलकीचे मार्गदर्शन.

आमच्यावर विश्वास का?

  • महिला डॉक्टरकडून खासगी व सविस्तर तपासणी
  • आजाराची माहिती सोप्या मराठी भाषेत
  • मराठी, हिंदी व इंग्रजीत संवाद
  • स्वच्छ व आरामदायी क्लिनिक, घराजवळ भुगावमध्ये
  • आठवड्याचे सातही दिवस सुरू

पहिल्या भेटीसाठी

पूर्वीचे रिपोर्ट्स, सोनोग्राफी व सध्या घेत असलेल्या औषधांची यादी सोबत आणा. पाळीच्या तक्रारीसाठी मागील दोन-तीन पाळ्यांच्या तारखा लिहून आणा.

प्रश्नोत्तरे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

क्लिनिक कुठे आहे?

शॉप नं. १, शतायु हॉस्पिटलच्या शेजारी, भुगाव, बावधन, पुणे ४१२११५. बावधन, भुकुम, पिरंगुट व पौड रोड परिसरातून सहज पोहोचता येते.

क्लिनिकची वेळ काय आहे?

सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ९, आणि रविवारी सकाळी ९ ते दुपारी २.

अपॉइंटमेंट कशी घ्यावी?

+91 84129 93865 या क्रमांकावर फोन किंवा WhatsApp करा. आधी वेळ घेतल्यास थांबावे लागत नाही.

महिला डॉक्टर तपासतात का?

हो. डॉ. सुरभी वामन-घैसास (MS OBGY (ISM)) स्वतः प्रत्येक रुग्णाची खासगी खोलीत तपासणी करतात.